
आलिया भट्ट बहिण शाहीन भट्टसोबत 72व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेली. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर येथे होणार आहे.

आलियाने परफेक्ट एअरपोर्ट लूकने चाहत्यांना आकर्षित केले. यावेळी आलियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यासोबत पांढरे बूट घातले होते.

आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बर्लिन स्पेशल सेगमेंटमध्ये दाखवला जाणार आहे.

गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर रिलीज झाला असून तो प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. संजय लीला भन्साळीसोबत आलियाचा हा पहिलाच चित्रपट आहे.

आलिया या चित्रपटात गंगूबाई कोठेवालीची भूमिका साकारत आहे. चित्रपटात आलिया भट्टशिवाय विजय राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवा दिसणार आहेत.