
अभिनेत्री आलिया भट्ट कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

आता अभिनेत्री नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. आलिया हिने नेसलेली साडी 100 वर्ष जुनी आहे. खुद्द अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये साडीबद्दल सांगितलं आहे.

पारंपरिक लूकमध्ये आलिया प्रचंड सुंदर दिसत आहे. आलिया हिने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी खास पारंपरिक लूक केला होता.

आलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.