लग्न करूनही Alka Yagnik नवऱ्यापासून 27 वर्षे राहिल्या दूर; काय होतं कारण?

| Updated on: Mar 20, 2022 | 7:36 AM

फक्त बॉलिवूडच नाही तर 16 भाषांमध्ये गाणं गायलेल्या गायिका अलका याज्ञिक (Alka yagnik ) यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडचं यश पाहिलेली गायिका म्हणून त्यांची ओळख आहे. पण हेच यश मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच त्याग करावे लागले.

1 / 7

2 / 7
अलका याज्ञिक यांनी वयाच्या 14 व्या वर्षी म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. आजच्या घडीला जवळपास दोन हजार गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी फक्त हिंदीच नाही तर 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

3 / 7
अलका याज्ञिक या कोलकात्याच्या. एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरात संगीताचं वातावरण होतं. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्या भजन किर्तन गायच्या. नंतर बॉलिवूडमध्ये चांगलं बस्तान बसवलं.

4 / 7
1989 मध्ये त्यांनी उद्योगपती नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. नीरज हे शिलाँगचे. लग्नानंतर या दोघांना एक -दोन नाही तर 27 वर्षे एकमेकांपासून दूर रहावं लागलं.

5 / 7
अलका याज्ञिक यांचे पती नीरज कपूर हे शिलाँगला बिजनसमॅन होते. त्यांचा सगळा व्यवसाय तिथेच होता. अलका यांना मुंबईत रहावं लागायचं. कारण त्यांचं काम, गाणं सगळं मायानगरीत होतं.

6 / 7
अलकासाठी मुंबईत येऊन नीरज कपूर यांनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. शेवटी अलका यांच्याच सांगण्यावरून ते परत शिलाँगला गेले आणि तिथंच व्यवसाय केला. अधूनमधून ते मुंबईत यायचे.

7 / 7
अशा पद्धतीनं त्यांना 27 वर्षे एकमेकांसोबत लग्न होऊनही लाँग डिस्टन्स रिलेशिनशिपमध्ये रहावं लागलं. अलका याज्ञिक यांनी मुलांचा एकहाती सांभाळ केला.