
अभिनेत्री अनन्या पांडे प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे. ड्रग्ज प्रकरणात नाव येण्यापूर्वीही ती अनेक वेळा चर्चेत राहिली आहे. मग ती तिचा रहस्यमय बॉयफ्रेंड असो किंवा एखाद्या शोदरम्यान स्ट्रगलवरचे तिचे विधान.

अनन्या आर्यनची बहीण सुहानाची खूप जवळची मानली जाते. त्यांचे एकत्र अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्यन खान सोबत सुद्धा अनन्या पार्टीज मध्ये भेटत असते. कारण तिची बहीण सुहाना होती, पण अनन्याचीही आर्यनशी चांगली मैत्री होती.

अनन्या तिच्या शाळेच्या दिवसात खूप खोडकर होती. तिचे अनेक परदेशी मित्रही होते. असं म्हटलं जातं की तिचा गूढ प्रियकरही तिच्या मैत्रांपैकी एक आहे.

पति पत्नी और वो च्या शूटिंग दरम्यान, अनेक माध्यमांमध्ये असे वृत्त आले की अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन यांच्यातील जवळीक वाढत आहे. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले पण नंतर दोघांनी ही बातमी नाकारली.

अनन्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात ती एका पार्टी दरम्यान हातात दारूचा ग्लास घेऊन दिसली होती, सोबत संजय कपूर देखील दिसले होते.

अनन्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनन्याला लवकरात लवकर या ड्रग्ज प्रकरणातून बाहेर पडावे, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.