
कॅटरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नानंतर आता अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाची चर्चा रंगलीय. 14 डिसेंबरला अंकिता लोखंडे-विकी विवाहबंधनात अडकणार आहेत.

मेहंदी कलाकार वीणा नागडा यांनी अंकिता लोखंडे हिला मेहंदी लावली. वीणा नागडा एक प्रसिद्ध मेहंदी कलाकार आहेत. अंकिताच्या आधी त्यांनी कॅतरिना कैफच्या हातावर मेहंदी लावली होती.

दोघांच्या लग्नाची गडबड सुरू झालीय. 11 डिसेंबरला अंकिताचा मेहंदी सोहळा होता. अंकिताच्या मेहंदी सेरेमनीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातायत.

अंकिता लोखंडे ही एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. लवकरच ती तिचा प्रियकर विकी जैनसोबत आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करणार आहे.

काही काळापूर्वी अंकितानं तिच्या इन्स्टाग्रामवर प्री-वेडिंग व्हिडिओ शेअर केला होता, जो चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षाहून जराही कमी नव्हता. अंकिताच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.