
टीव्ही शो 'अनुपमा' नेहमी टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतो. शोची कथा लोकांच्या हृदयात घर करतेय. पण शोमधील साधी दिसणारी पात्रं वास्तविक जीवनात बरीच बोल्ड आहेत आणि अनुपमाची सून किंजल म्हणजेच निधी शाहचा या यादीत पहिला नंबर येतो.

'अनुपमा' या मालिकेत अभिनेत्री निधी शाहला खूप पसंत केलं जात आहे. ती दररोज तिचे नवीन रूप दाखवून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करते.

शोमध्ये नेहमी साडी किंवा सूटमध्ये दिसणारी किंजल उर्फ निधी शाह वास्तविक जीवनात बिकिनी परिधान करण्यास मागे हटत नाही. जेव्हा तिला संधी मिळते, तेव्हा ती नक्कीच बिकिनीमध्ये फोटो शेअर करते, ज्यात ती देखील अप्रतिम दिसते.

निधीच्या करिअरची सुरुवात बॉलिवूडपासून झाली हे फार कमी लोकांना माहीत आहे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी निधीने 2013 मध्ये 'मेरे डॅड की मारुती' चित्रपटात काम केलंय. निधी शाहची या चित्रपटात छोटी भूमिका होती.

निधीला तिची खरी ओळख टीव्ही सीरियल 'तू हैं आशिकी' मधून मिळाली, त्यानंतर निधीने 'कवच' आणि 'कार्तिक पौर्णिमा' सारखे शोही केले. सध्या निधी 'अनुपमा' या टीव्ही सीरियलमध्ये खूप छान दिसत आहे. या मालिकेत ती अनुपमाचा मोठा मुलगा परितोषच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.