
छोट्या पडद्यावरची बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंतानं चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिचे लाखो चाहते आहेत.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते.

नेहमी नवनवीन फोटोशूट करून त्यातील फोटो देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीसही उतरतात.

आता शेवंता अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकदम हटके लूकमध्ये दिसतेय.

अपूर्वा अस्सल मुंबईकर! रुपारेल महाविद्यालयात शिकत असतानाच तिला पहिल्या मालिकेसाठी विचारणा झाली होती. अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.