
'कुछ कुछ होता है', 'दे दना दन', 'राजा हिंदुस्तानी', आणि 'अग्निपथ' यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज देखील अभिनेत्री झगमगत्या विश्वात सक्रिय आहे.

'कुछ कुछ होता है' सिनेमातील 'मिस ब्रिगेंजा' उर्फ अर्चना पुरन सिंग आज स्वतःचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्चना हिने १९८७ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अर्चना हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

'द कपिल शर्मा' शोमध्ये अर्चना हिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. कपिल शर्मा कायम अर्चना हिच्या खासगी आयुष्यावर विनोद करताना दिसतो... ज्यामुळे प्रेक्षक पोट धरुन हासतात...

पण शोमध्ये फक्त प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणाऱ्या अर्चना हिला तगडं मनधन मिळतं. अर्चना एका एपिसोडसाठी जवळपास १० लाख रुपये मानधन घेते. याचा अर्थ वर्षाला अभिनेत्री 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावते...

'द कपिल शर्मा शो'च्या तिसऱ्या सीझनपर्यंत अर्चना आठ लाख रुपये मानधन घ्यायची पण आता अभिनेत्री एका एपिसोडसाठी जवळपास १० लाख रुपये मानधन घेते. सोशल मीडियावर देखील अर्चना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.