
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा बहुचर्चित शहजादा हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झालाय. कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून शहजादा चित्रपटामुळे चर्चेत आहे.

या चित्रपटाचे गुरुवारी स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. याला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. शहजादा चित्रपट बघितल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर याने या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

अर्जुन कपूर याने त्याच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाविषयी रिव्ह्यू दिला आहे. इतकेच नाही तर अर्जुन म्हणाला की, कार्तिक आर्यन याचा शहजादा फुल पैसा वसुल चित्रपट आहे.

आज जरी कार्तिक आर्यन याचा शहजादा रिलीज झाला असला तरीही पहिल्या दिवशी चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन फार धमाकेदार होईल, असे नाहीये. कारण पठाण चित्रपटाचे आज दर कमी करण्यात आले आहेत.
