
बिग बॉस फेम आरती सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. आरती तिच्या फॉलोअर्ससाठी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिनं नुकतंच लाल ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे, तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोंमध्ये आरती बोल्ड पोज देताना दिसत आहे. एका फोटोमध्ये आरतीने तिच्या तोंडात लाल गुलाबाचं फुल ठेवलं आहे. दुसरीकडे ती पाउटिंग करताना दिसत आहे.

सेलेब्सही आरतीच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका चाहत्यानं कमेंट केली - तुम्ही खूप हॉट दिसत आहात. तर दुसऱ्याने लिहिलं - मस्त.

आरती सिंहने नुकतंच बिग बॉस 15 लाँच शो होस्ट केलं आहे. या कार्यक्रमात बिग बॉसची माजी स्पर्धक देवोलीना भट्टाचार्य आरतीसोबत दिसली होती. या कार्यक्रमात सलमान खान झूमच्या माध्यमातून जोडला गेला होता.

या कार्यक्रमात आरती खूप सुंदर दिसत होती. तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ज्यात ती खूप सुंदर दिसत होती.