
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनुष्का शर्मा लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सध्या अनुष्का तिचा पती आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लंडनमध्ये वेळ घालवत आहे. अशा परिस्थितीत नुकतंच तिने तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

चित्रपटांपासून दूर अनुष्का चाहत्यांसाठी आपले खास फोटो शेअर करत असते, मात्र आता तिने काही खास शेअर केले आहे. या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.

वास्तविक, अनुष्काने शेअर केलेले हे फोटो अभिनेत्री अथिया शेट्टीनं क्लिक केले आहेत.

अथियाने क्लिक केलेले फोटो शेअर करताना अनुष्कानं लिहिलं आहे की 10 हजार स्टेप्स आणि काही चांगले फोटो वाटेत आहेत. फोटो क्रेडिट अथिया शेट्टी.

आता फोटो क्लिक करण्यासाठी अनुष्कानं अथियाचं नाव घेतले आहे, त्यामुळे अथिया केएल राहुलबरोबर आहे की नाही असे प्रश्न चाहते विचारत आहेत.

अनुष्का शर्माचे इन्स्टाग्रामवर 51.5 फॉलोअर्स आहेत.