
गायक आणि रॅपर बादशाह याच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहेत. बादशाह लवकरच लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा सातत्याने रंगत होती.

विशेष म्हणजे बादशाह लग्न करणार असल्याचे कळताच चाहत्यांमध्ये आनंद बघायला मिळाला. सतत बादशाहच्या लग्नाच्या चर्चा सुरू असून बादशाह नेमका कोणासोबत लग्न करणार याबद्दल जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक होते.

शेवटी आता लग्नाच्या चर्चांवर बादशाहने मोठे विधान केले आहे. बादशाहने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत महत्वाची माहिती शेअर केलीये.

बादशाह याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, लग्नाबद्दल जी चर्चा सुरू आहे, त्यामध्ये काहीही सत्यता नाहीये. माझ्या लग्नाची जी चर्चा सुरू आहे ती फक्त आणि फक्त अफवाच आहे.

बादशाह याने स्पष्ट केले की, मी लग्न करणार नाहीये. बादशाह याने शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळत आहे. आता बादशाहची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.