
भारतात तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट कमावल्यानंतर अक्षय कुमारने थायलंडच्या बँकॉकमध्ये मार्शल आर्टचं शिक्षण घेतलं. तिथून परतल्यानंतर अक्षयनं त्याचं फोटोशूट केले, त्यानंतर त्याला 'दीदार' चित्रपटासाठी निवडण्यात आले.

अक्षय कुमारने आपल्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केल्यानंतर अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. ट्विंकल ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे.

अक्षय कुमारने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केले. लग्नानंतर अक्षय ट्विंकलच्या कुटुंबाशीही जोडला गेला.

अक्षय कुमारची कारकीर्द ट्विंकलसोबत लग्न झाल्यानंतरच बदलली, ट्विंकलशी लग्न केल्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

अक्षयने ट्विंकलशी लग्न करण्यापूर्वी तो शिल्पा शेट्टीला डेट करत होता. असं म्हटलं जातं की त्यानं शिल्पाला फसवूनच ट्विंकलसोबत लग्न केलं.

ट्विंकलच्या पालकांशिवाय तिची मावशी आणि बहीण देखील सिनेमाशी संबंधित आहेत. आज अक्षय कुमार त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे आणि त्याला एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा आहेत.