
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी तिच्या शानदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करते. राणी अनेकदा असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात.

नुकतंच राणी चॅटर्जीनं तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो आता व्हायरल होत आहेत.

राणीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये राणी लाल साडीसह पूर्ण ब्रायडल मेकअपमध्ये दिसत आहे.

राणीचे हे फोटो पाहून चाहते तिला विचारत आहेत की तिचं लग्न आहे का? मात्र, तिचा गेटअप आगामी चित्रपटाचा असल्याचे राणीने स्पष्ट केले आहे.

फोटोंमध्ये राणी खूपच गोंडस दिसत आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. राणीचे फोटो सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.