
‘बिग बॉस 14’ची विजेती अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) सध्या मालदीवमध्ये पती अभिनव शुक्लासोबत (Abhinav Shukla) सुट्टीचा आनंद लुटत आहे. मालदीव ट्रीपवरून रुबिना तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रुबिनाने आता तिचे फोटो लाल बिकिनीमध्ये पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये रुबिनाचा सिझलिंग अवतार दिसत आहे. लाल बिकिनीमध्ये रुबिना आकर्षक दिसत आहे. समुद्र किनाऱ्याचा आनंद घेत असताना रुबिनाने तिचे अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये रुबिना दिलैक लाल बिकिनी, सनग्लासेस, स्कार्फने बांधलेले केस, स्टेटमेंट चोकर नेकपीस घातलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये रुबिना नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे.

रुबिनाच्या या फोटोंवर चाहते हार्ट आणि फायर इमोजी बनवून अभिनेत्रीला प्रतिक्रिया देत आहेत. रुबिनाची मैत्रीण सृष्टी रोडे हिने देखील अभिनेत्रीच्या या फोटोंवर फायर इमोजी तयार केले आहेत. रुबिनाने नुकताच सृष्टीचा वाढदिवस साजरा केला होता.

समुद्रकिनारी दुपारचे जेवण करताना रुबिनाने फोटो शेअर केले आहेत. रुबिनाने मालदीवची सुंदर दृश्ये टिपणारा एक छान फोटोही शेअर केला आहे. हे जोडपे समुद्र किनाऱ्यावर एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

रुबिना आणि अभिनव यांच्या नात्यातही अनेक अडचणी आल्या होत्या, पण दोघांनी हार मानली नाही. त्यांच्या नात्यास आणखी एक संधी देण्यासाठी त्यांनी बिग बॉसमध्ये भाग घेतला आणि त्यांच्या नात्यातील दरी मिटवली. दोघांमधील नातं आता आणखी घट्ट झालं आहे. दोघेही आता पुन्हा आपल्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहेत.