
'बिग बॉस मराठी 3'चा विजेता विशाल निकम याने नवीन आलिशान गाडी विकत घेतली आहे.

या गाडीसोबतचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली.

'लोकल ट्रेन आणि बाईकने प्रवास करत इथंपर्यंत पोहोचलोय. आता लांबचा पल्ला गाठायचा म्हटलं, तर सोबतीला गाडी असलेली बरी. बाकी तुमची साथ आणि माऊलींचा आशिर्वाद आहेच,' असं त्याने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

बिग बॉसच्या घरातील विशालचा खास मित्र विकास पाटील याने कमेंट करत विशालला शुभेच्छा दिल्या आहेत.

'गाडी आली भावाची, आता सुट्टी नाय', अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला आहे.