
बॉलिवूडची सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज एक शायनिंग स्टार आहे. आज जॅकलिन तिचा वाढदिवस साजरा करतेय. तिचा जन्म 11 ऑगस्ट 1985 रोजी झाला होता. अभिनेत्री मूळची श्रीलंकेची आहे.

जॅकलिनला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिनं पहिला कार्यक्रम होस्ट केला होता तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती.

तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या जॅकलिननं सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचं शिक्षण पूर्ण केलं आणि श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होता.

जॅकलिन फर्नांडिसची 2006 मध्ये मिस श्रीलंका युनिव्हर्स म्हणून निवड झाली आणि त्यानंतर 2009 मध्ये 'अलादीन' चित्रपटासाठी ऑडिशन दिल्यानंतर तिचं सिलेक्शन झालं. या चित्रपटानंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही.

आज जॅकलिन एक अशी अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठ्या अभिनेत्रींना आपल्या बोल्ड अभिनयाने मागे टाकते.

जॅकलिन अनेकदा तिच्या बोल्ड स्टाईलची जादू सोशल मीडियावर दाखवते. तिची ही स्टाईल चाहत्यांच्याही पसंतीस उतरते.