
अभिनेत्री इहाना ढिल्लोंचा आज वाढदिवस आहे, तिनं आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात पंजाबी चित्रपटसृष्टीतून केली. इहाना ढिल्लों आज तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.

इहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.

नुकतंच इहाना भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटात दिसली होती. तिनं चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील इहानाचं पात्र खूप लहान असलं, तरी खूप प्रभावीही होतं.

इहाना पंजाबी इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे, आता तिचं नाव बॉलिवूड कॉरिडॉरमध्येही दिसू लागले आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते.

तिच्या अभिनयाव्यतिरिक्त लोक इहानाला आणखी एका गोष्टीमुळे ओळखतात. कारण अभिनेत्री डायना पेंटीसारखी दिसते.

इहाना केवळ चित्रपटांमध्ये सक्रिय नाही, तर त्याचबरोबर ती म्युझिक व्हिडीओमध्येही काम करते. तिचा म्युझिक व्हिडीओ बेवफा मासूम तेरा चेहरा प्रचंड हिट झाला होता.