
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आज ती तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सुरभीचा जन्म 11 सप्टेंबर 1989 रोजी झाला. आज तिला टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या दमदार कामगिरीसाठी खास ओळख मिळाली आहे. तिला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. तिचे काही अतिशय सुंदर फोटो पाहूयात.

टीव्हीची हॉट अभिनेत्री सुरभी चंदना तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं सर्वांची मनं जिंकते.

सुरभी चंदनाची बोल्ड स्टाईल पाहायला मिळाली. ‘नागिन 5’मध्ये बानीच्या भूमिकेत दिसलेल्या सुरभी चंदनाला चाहत्यांनी खास पसंती दिली.

सुरभीने 2009 मध्ये टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' पासून आपल्या करिअरची सुरुवात केली.

सुरभीनं 2014 मध्ये 'बॉबी जासूस' चित्रपटात आमना खान नावाच्या मुलीची भूमिका केली होती. ही तिची छोटी भूमिका होती.

सुरभी टीव्ही इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा आहे तिने 8 शीर्ष मालिकांमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे.

सोशल मीडियावर सुरभीचे 4.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती चाहत्यांसाठी हॉट फोटो शेअर करत असते.