
शबाना आझमी या बॉलिवूडच्या प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही त्या आपल्या अभिनयानं तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करू शकतात. शबाना त्यांच्या काळात खूप सुंदर अभिनेत्री होत्या आणि त्यांचे सौंदर्य आणि स्वभाव पाहून जावेद अख्तर यांना प्रेम झालं.

जावेद यांनी शबाना आझमी यांची कैफी आझमी यांच्या घरी भेट घेतली. ते शबाना यांनी तिथे अनेक वेळा भेटले आणि त्यांच्या प्रेमात पडत गेले. शबाना या त्यावेळी जावेदकडे दुर्लक्ष करायच्या कारण जावेद यांचं त्यावेळी लग्न झालं होतं. हनी इराणी त्यावेळी जावेद यांच्या पत्नी होत्या.

शबाना यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जावेद विवाहित होते जेव्हा आम्हाला समजलं की आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत. तेव्हा आम्ही शक्य तितकं एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला.

जावेद आणि शबाना यांच्या जवळीकतेच्या बातम्या ऐकल्यानंतर हनी आणि त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. मात्र दोघांनीही त्याचा परिणाम मुलांवर पडणार नाही यासाठी नेहमी प्रयत्न केले. हनी आणि जावेद 1978 मध्ये विभक्त झाले आणि नंतर शबाना आणि जावेद यांनी 6 वर्षे एकमेकांना डेट केलं.

शबाना यांनी सांगितलं होतं की एकदा त्यांनी शेवटचं भेटण्याचं ठरवलं आणि त्या शेवटच्या भेटीत दोघंही एकमेकांसोबत ब्रेकअप करणार होते. पण जेव्हा ते दोघं भेटले तेव्हा दोघंही गोष्टींमध्ये इतके व्यस्त झाले की ते ब्रेकअप करणं विसरले.

शबाना आणि जावेद यांचे 1984 मध्ये लग्न झालं आणि दोघंही वर्षानुवर्षे एकमेकांसोबत आहेत. दोघांनीही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रत्येक चढ -उतारात एकमेकांना साथ दिली आहे. शबाना आणि जावेद यांच्या नात्याची खास गोष्ट म्हणजे दोघंही पती -पत्नीपेक्षा चांगले मित्र आहेत आणि त्यांची मैत्रीच त्यांचं नातं मजबूत करतेय.