
अभिनेत्री मोनालिसाचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. मोनालिसा प्रत्येक वेळी तिच्या ग्लॅमरस अवतारानं चाहत्यांची मनं जिंकते.

मोनालिसा रोज तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी तिनं लाल साडीत फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बोल्ड लूक देताना दिसत आहे.

हे फोटो शेअर करत मोनालिसानं चाहत्यांना एक आनंदाची बातमीही दिली आहे. फोटो शेअर करत तिनं लिहिलं - मला माझं काम आवडतं. प्रत्येक अभिनय प्रकल्प नवीन सुरुवात करतो. मी पहिल्यांदाच एक वेगळं पात्र साकारणार आहे.

मोनालिसा ‘रात्रि के यात्री 2’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. हे फोटो तिच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आहेत.

मोनालिसा नुकतंच पती विक्रांतसोबत मालदीवमध्ये सुट्टी साजरी केल्यानंतर परत आली आहे. तिने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.