
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी फोटो शेअर करते. आता अभिनेत्रीने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

मौनीने पांढर्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एकदम बोल्ड दिसत आहे.

मौनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. लवकरच ती दुबईतील एका बिझनेसमनशी लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, मौनी पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

मौनीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत.