
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वी पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या हा चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि हा शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

शाहरुख खान

शाहरुख खान हा म्हणाला की, हे दहशतवादी जो इस्लाम फॉलो करतात तो आमचा इस्लाम नाहीये. तो आमचा धर्मच नाहीये. इस्लाम धर्माचा विचार केला तर त्यात कुठेही असा उल्लेख हा करण्यात नाही आला. इस्लाम दया शिकवत असल्याचे देखील शाहरुख खान याने म्हटले.

शाहरुख खान म्हणाला, अल्लाह पवित्र कुराणमध्ये म्हणतो की, जर एखाद्या व्यक्तीने एका दुसऱ्या माणसाला बरे केले तर तो संपूर्ण मानवजातीला बरे करतो आणि जर त्याने एका मानवाला दुखवले तर तो संपूर्ण मानवजातीला दुखावतो.

या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा इस्लामबद्दल बोलताना दिसत आहे. शाहरुख खान याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जुना आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटानंतर डंकी चित्रपटाचे शूटिंग हे सुरू केले आहे. जवान चित्रपटाच्या सेटवरील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते.