
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आलिया भट्ट ही एका वर्षाला तगडी कमाई देखील करते. बाॅलिवूडमध्ये आलिया भट्ट हिला करण जोहर याने लाॅन्च केले आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या आलिया भट्ट हिने केल्या आहेत.

एका रिपोर्टनुसार आलिया भट्ट हिची संपत्ती ही तब्बल 299 कोटी आहे. एका वर्षात चित्रपटांमधून आलिया भट्ट ही 60 कोटी कमावते. गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी आलिया भट्ट हिने 20 कोटी फिस घेतली होती.

इंस्टाग्राम आणि ट्विटरवरून आलिया भट्ट ही वर्षाला 1 कोटी रूपये कमाई करते. जाहिरातीमधूनही आलिया भट्ट ही चांगली मोठी कमाई करते. मुंबई आणि लंडनमध्ये देखील आलिया भट्ट हिचे घर आहेत.

मुंबईमध्येही आलिया भट्ट हिचे दोन प्लॅट आहेत. याशिवाय आलिया भट्ट हिच्याकडे बीएमडब्ल्यू, ऑडी अशा गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. आलियाच्या लंडनच्या घराची किंमत जवळपास 37 कोटी आहे.

आलिया भट्ट हिने 14 एप्रिल 2022 मध्ये रणबीर कपूर याच्यासोबत लग्न केले. 6 नोव्हेंबरला आलिया भट्ट हिने एका मुलीला जन्म दिलाय. आलिया हिने तिच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे.