
अभिनेत्री आलिया भट हिचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं आलिया दररोज वेगळ्या पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसून प्रमोशन करताना दिसत आहे.

आजही तिने पांढऱ्या रंगातल्या साडीतले फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिच्यासोबत एक मांजरही दिसत आहे. या फोटोला तिने "एडवर्ड भाई आणि गंगुबाई", असं कॅप्शन दिलं आहे.

तिने शेअर केलेले हे फोटो गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग आहेत.

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया साकारत असलेलं गंगूबाई हे पात्र कायम पांढऱ्या रंगाची साडी नेसतं. त्यामुळे तीही पांढऱ्या रंगााच्या साडीतले फोटो शेअर करत सिनमाचं प्रमोशन करताना दिसते आहे.

तिच्या चाहत्यांनी आलियाच्या या फोटोंवर कमेंट करून तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.