

नुकताच करीना कपूर हिने एक मुलाखत दिलीये. आता या मुलाखतीमुळे करीना कपूर ही चर्चेत आलीये. करीना कपूर हिने या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आणि आपल्याला अभिनेत्री व्हायचे नव्हते असे करीना कपूर हिने म्हटले आहे.

2000 मध्ये करीना कपूर हिचा पहिला चित्रपट रिलीज झाला होता. तब्बल 23 वर्षांनंतर आपल्याला अभिनेत्री व्हायचे नसल्याचे करीना कपूर हिने म्हटले आहे. करीना कपूर म्हणाली की, मला एयर होस्टेस किंवा लॉयर व्हायचे होते.

आता करीना कपूर हिचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. करीना कपूर हिच्या या विधानामुळे सध्या ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. अनेकांनी यावरून करीना कपूर हिला खडेबोलही सुनावले आहेत.

करीना कपूर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर हिचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता.