
अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

करीना कायम तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चात असते, पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे नाही तर, सौफ सोबत काढलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

सैफसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, “दिवाळीचा सनसेट माझ्या प्रेमासोबत”, सध्या सर्वत्र करीनाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते. दोघे कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

सैफ याच्यासोबत लग्न केल्यानंतर करीनाने दोन मुलांना जन्म दिला. अभिनेत्री सोशल मीडियावर मुलांसोबत देखील फोटो पोस्ट करत असते.