
अभिनत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. काळ्या ड्रेसमध्ये रश्मिका प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. रुपरी पडद्यावर अभिनेत्री जेवढी ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर कायम रश्मिका हिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

रश्मिका कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत आहे. फेब्रुवारी महिन्यात दोघे साखरपुडा करणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे.

रश्मिका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत ‘पुष्पा’ सिनेमानंतर मोठी वाढ झाली. ‘पुष्पा’ सिनेमात यश मिळवल्यानतंर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

‘गुडबाय’ सिनेमातून रश्मिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या रश्मिका 'ॲनिमल' सिनेमामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील रश्मिका कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.