
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सध्या सुरू आहे. या लग्नसोहळ्याला सेलिब्रिटींची हजेरा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सारा अली खानने देखील राधिका- अनंत यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली.

सारा अली खानने यावेळी गोल्डन कलरचं आऊटफिट घातलं होतं. तिच्या या लूकची नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे. अनेकांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

मेरे यार की शादी है... चमचमती संध्याकाळ... हा दिवस मी कधीही विसरणार नाही, असं म्हणत साराने राधिका- अनंत यांच्या संगीत सोहळ्यातील फोटो शेअर केलेत.

साराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. तर काहींनी कमेंट करत तिच्या लूकला दाद दिली आहे. सारा तू तुझी आई अभिनेत्री अमृता सिंगची कॉपी आहेस, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

सारा अली खान वेगवेगळे लूक ट्राय करत असते. कधी साडी कधी लेहंगा तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्या सारा दिसते. असाच एक साराचा हा खास लूक...