
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने लग्नाच्या 8 वर्षांनंतर पती मोहसिन अख्तर मीर याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांनी 4 फेब्रुवारी 2016 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचे फोटो आज देखील व्हायरल होत असतात.

पहिल्या भेटीनंतर दोघांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं. त्यानंतर उर्मिला आणि मोहसीन यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट दिली, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

उर्मिला आणि मोहसिन यांच्यामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. उर्मिला पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.पण आता दोघांचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

उर्मिला आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.