
बॉलिवूड स्टार अनिल कपूर आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतात. वयाच्या 67 व्या वर्षीही ते खूप यंग दिसतात. अलीकडेच ‘एनिमल’ चित्रपटात ते रणबीर कपूरच्या पित्याच्या भूमिकेत होते.

मागच्या 40 वर्षापासून ते चित्रपट सृष्टीत आहेत. अनिल कपूर यांचा प्रवास सोपा नव्हता. स्पॉटबॉय ते अभिनेते बनलेले अनिल कपूर चित्रपटाच्या थिएटरबाहेर ब्लॅकमध्ये चित्रपटांची तिकीट विकायचे.

बऱ्याच कष्टानंतर त्यांनी यश पाहिलं. 1971 साली ‘तू पायल में गीत’ चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. पण हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

त्यानंतर 1979 साली अनिल कपूर ‘हमारे तुम्हारे’ चित्रपटात सपोर्टिंग रोलमध्ये दिसले. त्यानंतर त्यांनी हिंदी, तेलगु आणि कन्नड चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याने रोल केले. 1983 साली ‘वो सात दिन’ चित्रपटाच लीड रोलची संधी मिळाली.

अनिल कपूर यांची नेटवर्थ म्हणजे एकूण संपत्तीबद्दल बोलायच झाल्यास रिपोर्ट्सनुसार ते 140 कोटी रुपये संपत्तीचे मालक आहेत. अभिनयासोबत ते ब्रांड एंडोर्समेंटमधून सुद्धा कमाई करतात.