
प्लॅनेट मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्या मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आधी रेड कार्पेटवरील लूक आणि त्यानंतर स्टेजवर जबरदस्त परफॉर्मन्स यांमुळे सोनालीची चर्चा होती.

या पुरस्कार सोहळ्यात सोनालीने ये चंद्राला, मन चिंब पावसाळी, शहारल्या मनात मलमली, नको नको ना रे या गाण्यांवर नृत्य सादर केलं. सोनालीने तिच्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ केलं.

या परफॉर्मन्सचे फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 'कसं वाटलं माझं सादरीकरण', असा प्रश्न तिने चाहत्यांना विचारला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होता आहे.

या पुरस्कार सोहळ्यात सोनालीने 'धुरळा' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटातील सोनालीच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.

सोनाली सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेसबाबत अत्यंत जागरूक असते. यासाठी ती दररोज वर्कआऊट करते आणि विशिष्ट डाएट फॉलो करते. या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असते.