
झी मराठी वाहिनीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) मराठी टेलिव्हिजनवर पुनरागम करत आहे.

ही एक अनोखी प्रेम कथा प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. महत्त्वाचं म्हणजे श्रेयसला चाहत्यांची पसंतीस मिळतेय.

आता हँडसम हंक श्रेयसनं नवं फोटोशूट केलं आहे. हे फोटो त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

अनेक हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमधून श्रेयसनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे त्याच्या चांगला फॅनबेस आहे.