
टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर राहुल चहर त्याच्या शानदार गोलंदाजीने चाहत्यांना वेड लावतो. याशिवाय तो प्रेमाच्या खेळपट्टीवरही खूप यशस्वी झाला आहे. बघूया त्याची मैत्रीण कोण आहे.

राहुल चहर त्याची मैत्रीण ईशानीच्या बऱ्याच वर्षापासून प्रेमात आहे. राहुल चाहरने 2019 मध्ये इशानीशी साखरपुडा केलाय. राहुलचा चुलत भाऊ क्रिकेटर दीपक चहरही या सोहळ्याला उपस्थित होता.

राहुल चहर सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतो. ईशानी सोबत तो विविध पोझेसमध्ये फोटो पोस्ट करत असतो.

राहुल चहर आणि ईशानीचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूपच बोल्ड अंदाजात पाहायला मिळतात.

क्रिकेट फॅन्सना राहुल चहर आणि इशानीच्या लग्नाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.