
नुकतंच आई झालेली दिया मिर्झा तिच्या मातृत्वाचा आनंद घेत असल्याचं दिसतंय. तिने तिचा मुलगा अवयान आजाद रेखीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फोटोसोबतच तिने एक भावनिक नोट देखील लिहिली. दिया मिर्झाच्या मुलाचा जन्म याच वर्षी 14 मे रोजी झाला होता.

दिया मिर्झा सोशल मीडियावर तिच्या नवजात मुलाची, अवयान आजाद रेखीची झलक दाखवली. 17 सप्टेंबर रोजी तिने चाहत्यांना त्यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर एक नवीन फोटो पोस्ट केला.

अवयानचा चेहरा मोनोक्रोमॅटिक फोटो स्पष्ट नाहीये, मात्र अवयान त्याच्या आईच्या कुशीत विश्रांती घेताना दिसतो आहे. आई-मुलाची ही जोडी एकदम मोहक दिसतेय.

दीया मिर्झाने तिच्या पोस्टला कॅप्शन दिलं, “आमची कथा अवयान 15.09.2021 पासून नुकतंच सुरू झाली आहे.