
टीव्ही अभिनेत्री दिशा परमार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिशा 16 जुलै रोजी गायक राहुल वैद्यशी लग्न करणार आहे. साधी दिसणारी दिशा अनेकदा आपल्या बोल्ड अवताराचा तडका दाखवते. अनेकदा ती सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते.

सोशल मीडियावर तिचे फोटो चाहत्यांना घायाळ करत असतात. दिशाचा बोल्ड लूक त्यांच्या पसंतीस उतरतो. गेले अनेक दिवस राहुल आणि दिशा एकमेकांना डेट करत होते. आता दोघं लग्नबंधनात अडकणार असल्यानं चाहते प्रचंड उत्साही आहेत.

दिशानं आपल्या करिअरची सुरूवात लोकप्रिय टीव्ही शो 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार' यातून केली. या शोमध्ये दिशा परमारनं पंखुरी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

टीव्ही शो 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार' या शोमधून दिशाला लोकप्रियता मिळाली. तेव्हापासूनच दिशा चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र दिशाचे फॅन्स नेहमीच सोशल मीडियावर तिच्या पोस्टची प्रतीक्षा करत असतात.

दिशा चाहत्यांसाठी आपल्या बोल्ड लूकमधील फोटो वेगवेगळ्या अंदाजात शेअर करत असते. शिवाय दिशा अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. आता ती सोशल मीडियावर आग लावतेय.

दिशाला बिग बॉस 14 मध्ये राहुल वैद्यनं प्रपोज केलं होतं आणि शोमध्ये गेल्यानंतर दिशाने लग्न करण्याची तयारी दर्शविली. आता दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.