
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री प्रियांका चोप्रानं 18 जुलै रोजी लंडनमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी तिचा नवरा निक जोनस तिच्यासोबत नव्हता. निक सध्या प्रियंका चोप्रापासून दूर आहे. निकनं प्रियंका चोप्राला सुंदर भेट पाठवली. प्रियांका चोप्राला सुरुवातीपासूनच वाईनची आवड होती. ज्यामुळे निकने पत्नीला एक महाग वाईनची बॉटल पाठवली होती.

प्रियंका चोप्रानेही या बॉटलचे फोटो तिच्या चाहत्यांसह तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या बॉटलचे नाव आहे 'चॅटू माउटन रोथ्सचाइल्ड 1982'. असं म्हटलं जातं की ही वाइन मिळवणे फारच अवघड आहे आणि फारच कमी लोकांना ते विकत देखील घेता येते.

सोशल मिडीयावर या बॉटलचे फोटो शेअर करत प्रियंका चोप्रानंही आपले प्रेम व्यक्त केले आहे.

हे फोटो शेअर करत प्रियंका चोप्रानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की "लव्ह यू निक जोनस". सध्या त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये बीजी असलेला निक जोनस यानंही आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

निक आणि प्रियांकाचं 2018 मध्ये भारतात लग्न झालं होतं. असं म्हटलं जातं की हे भारतातील 10 रॉयल वेडिंग्जपैकी एक होतं. अशा परिस्थितीत, सध्या प्रियंका चोप्रा लंडनमध्ये तिच्या पुढील वेब सीरिजसाठी शूट करत आहे.