
वाणी कपूरनं बॉलिवूड करियरची सुरुवात ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून केली. वाणी सोबतच सुशांत सिंह राजपूत आणि परिणीती चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. जरी या चित्रपटातून वाणीनं पदार्पण केलं, तरी हे 2 स्टार असूनही वाणीला चित्रपटात जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

पहिल्याच चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर वाणीनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आणि त्यानंतर तिनं एका तामिळ चित्रपटात काम केलं. यानंतर वाणीनं बेफिक्रे चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.

वाणीनं बॉलिवूडमध्ये करियर सुरू करण्यापूर्वी हॉटेल्समध्येही काम केलं आहे. वाणीनं टूरिझममध्ये पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनं हॉटेलमध्ये इंटर्नशिप करण्यास सुरुवात केली. यानंतर वाणीनं मॉडेलिंगमध्ये करिअरला सुरुवात केली.

तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना वाणीनं सांगितलं होतं की तिनं वयाच्या 18-19 वर्षात मॉडेलिंगला सुरुवात केली होती आणि ती स्वतःचा खर्च स्वतः करायची. तिनं कधीच तिच्या आई -वडिलांकडे पैसे मागितले नाहीत.

वाणीकडे आता अनेक प्रकल्प आहेत. ती लवकरच बेल बॉटम नंतर शमशेरा आणि चंदीगड करे आशिकी मध्ये दिसणार आहे.