
दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटाततील माजी महापौर मीनाक्षी शिंदे आयोजित कार्यक्रमात गौतमी पाटील हिने भन्नट नृत्य सादर करत, चाहत्यांना मंत्र मुग्ध केलं.

गौतमी पाटील हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गौतमी पाटील हिला ठाणेकरांनी भरभरुन प्रेम दिलं.. असं वक्तव्य खुद्द गौतमी हिने केलं.

'सबसे कातिल गौतमी पाटील' म्हणून ख्याती मिळवलेल्या गौतमीची लोकप्रियता अजूनही कायम आहे. आता तर तिने सिनेक्षेत्रात पदार्पण केल्याने तिची क्रेझ अधिकच वाढली आहे.

गौतमी पाटील लवकरच “घुंगरू एक संघर्ष” सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. गौतमीचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गौतमी पाटील हिच्या चाहत्यांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील गौतमी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.