
कतरिना कैफ आणि अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' दिवाळीला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर चित्रपटातील कलाकारांनी 'सूर्यवंशी'चं प्रमोशन जोरात सुरू केलं आहे.

कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहे. या दरम्यान तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

आता तिने एका तपकिरी टोन्ड साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

कतरिना कैफच्या लांब बाहीच्या ब्लाउजमध्ये मिश्रित प्रिंट आहे. तिचे ही स्टाईल तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहे.

'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमार वीर सूर्यवंशी नावाच्या आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे आणि कतरिना कैफ त्याची पत्नी म्हणून दिसणार आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त, अजय देवगण आणि रणवीर सिंह देखील चित्रपटात दिसणार आहेत.