
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या बॉन्डिंगविषयी नेहमीच चर्चा होत असते. दोघंही सेलिब्रिटी असून जेव्हा जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा ते जगाचे लक्ष वेधून घेतात. मात्र मलायका अरोरासोबतचे प्रेम प्रकरण अर्जुनसाठी इतकं सोपं नव्हतं.

मलायका यापूर्वीच विवाहित आहे आणि एका मुलाची आई देखील आहे. दुसरीकडे ती सलमान खानच्या घराचा एक भाग होती.

याशिवाय अर्जुन आणि मलायकाच्या वयातही मोठा फरक आहे. मात्र अर्जुन कपूर मलायकाच्या प्रेमात होता आणि मलायकासोबत सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करत होता.

अर्जुन कपूरबद्दल असं म्हटलं जातं की, या नात्यापूर्वी अभिनेता सलमान खानची बहीण अर्पितासोबत रिलेशनशिपमध्ये होता. तो सलमान खानच्या घरीही जायचा. मात्र नंतर अर्जुननं अर्पिताशी ब्रेकअप केलं.

मात्र यानंतरही अर्जुन कपूरचे सलमान खानच्या कुटूंबासोबत चांगले संबंध होते. अभिनय क्षेत्रात पदार्पण आणि कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तो सलमान खानचा सल्ला घेत होता. या संदर्भात तो सलमान खानच्या घरी जायचा.

या दरम्यान अर्जुन आणि मलायका यांच्यात चांगली बॉन्डिंग झाली. रिपोर्ट्सनुसार अर्जुन कपूर सुरुवातीला मलायकाची गर्ल गँग करिना आणि अमृतासोबत क्लोज गेला आणि एकत्र सुटीवर जाऊ लागला. यादरम्यान मलायकासुद्धा एकत्र होती. या दरम्यान दोघं एकमेकांच्या जवळ आले.

मलायका आणि अरबाजच्या नात्यात काही ठीक नव्हतं. मलायकानं अरबाजचं घर सोडलं आणि ती आपल्या मुलासोबत वेगळ्या फ्लॅटमध्ये राहू लागली. असं म्हणतात की मलायका आणि अर्जुनचे संबंध पाहून लोकांना संशयास्पद वाटू लागलं होतं. अर्जुन रात्री उशिरा या फ्लॅटमध्ये मलायकाला भेटायला जायचा.

सुरुवातीला जेव्हा हे नातं लोकांसमोर आलं तेव्हा अर्जुन आणि मलायका यांच्यावरही खूप टीका झाली. या दोघांमध्ये 11 वर्षांचं अंतर आहे. याबाबत सोशल मीडियावरही ते बरेच ट्रोल झाले होते. मात्र या दोघांनीही प्रत्येक गोष्टीचा सामना करत एकमेकांबद्दल असलेला आदर आणि प्रेम कधीही कमी होऊ दिलं नाही.