
अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) हिने ‘बालिका वधू’ची ‘आनंदी बहू’ बनून सर्वांची मने जिंकली होती. ‘जग्ग्या’शी लढा देण्याची आणि आपल्या निरागस शब्दांनी भल्याभल्यांना मोठा धडा देण्याची तिची शैली चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.

अविकाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. या शोमधून ती घरोघरी ओळखली जाऊ लागली. ‘बालिक वधू’ची ही छोटी आनंदी आता मोठी झाली आहे आणि सोशल मीडियावर सतत आपले फोटो शेअर करत असते.

अविका आज (30 जून) तिचा 24वा वाढदिवस साजरा करत आहे. अविकाचा जन्म 30 जून 1997 रोजी मुंबई येथे झाला होता. अलीकडेच, अविकाने तिच्या ट्रांसफॉर्मेशनने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये अविकाने 13 किलो वजन कमी केले. सोशल मीडियावर आपल्या वजन कमी झालेले ट्रांसफॉर्मेशन फोटो शेअर करुन तिने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. तिने साडीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती.

वजन कमी झाल्यानंतर आता अविका सोशल मीडियावर आपली हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत राहते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.

अविकाही तिच्या रिलेशनशिपमुळे देखील बरीच चर्चेत राहिली आहे. ती मिलिंद चांदवानीला डेट करत आहे आणि त्याच्याबरोबर इन्स्टाग्रामवर पोस्ट्स शेअर करत असते.

वर्क फ्रंट बद्दल बोलायचे तर, अविकाचा म्युझिक व्हिडीओ ‘दिल को मेरे’ नुकताच प्रदर्शित झाला होता. जो खूप पसंत केला गेला. हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.