Happy Birthday Sana Khan | ‘बिग बॉस’मधून मिळवली प्रसिद्धी, आता मौलावीशी निकाह करून संसारात रमलीय अभिनेत्री सना खान!

| Updated on: Aug 21, 2021 | 7:28 AM

मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री सना खान (Sana Khan) 21 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा करते. 1988मध्ये मुंबईत जन्मलेल्या सना खानने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरात चित्रपटांपासून केली होती. हिंदी व्यतिरिक्त तिने तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपट केले आहेत.

1 / 5
मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री सना खान (Sana Khan) 21 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा करते. 1988मध्ये मुंबईत जन्मलेल्या सना खानने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरात चित्रपटांपासून केली होती. हिंदी व्यतिरिक्त तिने तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. सनाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला अशाच काही खास गोष्टी सांगणार आहोत...

2 / 5
सना मुंबईच्या धारावी परीसरामध्ये लहानाची मोठी झाली. तिचे वडील कन्नूर येथील मल्याळी मुस्लिम आहेत. त्याचबरोबर त्याची आई सईदा मुंबईची रहिवासी आहे. तिने सुरुवातीचे शिक्षण मुंबईतूनच केले. लहानपणापासूनच सनाने अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते.

3 / 5
सना खानने 2005 मध्ये 'ये है हाय सोसायटी' या लो बजेटच्या चित्रपटातून पदार्पण केले. 'बॉम्बे टू गोवा', 'धन धना धन गोल' या चित्रपटांमध्ये तिने विशेष भूमिका केल्या. हिंदी चित्रपटांमध्ये फारसे यश न मिळाल्याने ती दक्षिणात्य चित्रपट उद्योगाकडे वळली. 2014 मध्ये सना सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटात दिसली होती. यानंतर तिने 'वजह तुम हो' आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा' सारखे चित्रपट केले.

4 / 5
सना खानने 2012 मध्ये 'बिग बॉस' सीझन सहामध्ये भाग घेतला होता. ती या शोमधील टॉप तीन स्पर्धकांमध्ये होती. याशिवाय सनाने 'झलक दिखला जा 7', 'खतरों के खिलाडी 6', 'कॉमेडी नाइट्स बचाओ', 'एंटरटेनमेंट की रात' आणि 'किचन चॅम्पियन'मध्येही काम केले.

5 / 5
काही वर्षांपूर्वी सना डान्सर आणि कोरिओग्राफर मेल्विन लुईसला डेट करत होती. सोशल मीडियावरील एका प्रदीर्घ पोस्टमध्ये तिने लुईसवर फसवणुकीचा आरोप केला. त्याचवेळी लुईसने सांगितले की, सानाने त्याची जात आणि त्वचेच्या रंगाची खिल्ली उडवली होती. त्यानंतर सनाने मनोरंजन विश्वाला अलविदा म्हणत एका मौलवीशी निकाह केला आणि ती संसारात रमली आहे.