
वरुण शर्माने फुकरे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात वरुणने चुचाची भूमिका साकारली होती. पहिल्याच चित्रपटात वरुणने जबरदस्त भूमिका केली होती. एवढेच नाही तर वरुण याच नावाने प्रसिद्ध झाला. (फोटो: इंस्टाग्राम)

वरुणने रब्बा मैं क्या करूं, वॉर्निंग, यारा दा ब्रेकअप, डॉली की डोली सारखे चित्रपट केले. मात्र यासर्व चित्रपटांमध्ये वरूणला विशेष नाव भेटले नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

वरुणने रोहित शेट्टीच्या 'दिलवाले' या सुपरहिट चित्रपटात काम केले आणि पुन्हा एकदा त्याने आपल्या कॉमेडीने सर्वांची मने जिंकली. (फोटो: इंस्टाग्राम)

वरुणने छिछोरे चित्रपटात जबरदस्त अभिनय केला. केवळ प्रेक्षकांनीच नाही तर समीक्षकांनीही त्यांचे तोंड भरून कौतुक केले. (फोटो: इंस्टाग्राम)

आता वरूण सर्कस या चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत रणवीर सिंह आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)