
नताशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, हार्दिक पांड्या याची पत्नी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. त्यामुळे नताशा कायम स्वतःच्या सौंदर्याची आणि फिटनेसची काळजी घेत असते. शिवाय तिच्या चेहऱ्यावरील ग्लो देखील चाहत्यांना आकर्षित करतो.

नताशा कायम आईस क्यूबचा वापर करते. चेहऱ्याावर बर्फाचा उपयोग केल्यामुळे नताशा हिच्या चेहऱ्यावर कायम ग्लो दिसून येतो. नताशा कायम सोशल मीडियवर आईस क्यूबने तयार केलेल्या फेसपॅकचा फोटो पोस्ट करत असते.

चेहऱ्यावर आईस क्यूब लावण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावर असलेली सूज कमी होण्यास मदत होते. तुम्हाला बर्फामध्ये काही काळ चेहरा ठेवायचा आहे. असं केल्याने चेहऱ्यात झालेले बदल तुम्हाला जाणवतील.

वाढत्या वयासाठी बर्फ लाभदायक आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर तुमचं वय दिसत नाही. तुम्ही देखील नताशा हिच्या चमकदार चेहऱ्यामागील रहस्य कराल तर तुमच्या देखील चेहऱ्यावर तेज दिसून येईल...

फक्त स्किन केअर नाही तर, नताशा जीममध्ये जावून देखील कसरत करत असते. नताशा तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

नताशा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, नताशा आणि हार्दिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर पोहोचले आहेत. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देखील नताशा हिने पती हार्दिक याला शुभेच्छा दिल्या नाही.