
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सतत चर्चेत असते. आता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तेजस्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा नवा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

नुकतंच तेजस्विनीनं हे स्वॅगमधील फोटो शेअर केले आणि लगेच या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

गेले अनेक दिवस तेजस्विनी समांतर 2 या मराठी वेब सिरीजमुळे चर्चेत होती. यात तिनं कुमार महाजन अर्थात अभिनेता स्वप्निल जोशीच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यामुळे गेले अनेक दिवस चाहत्यांनी तिला साध्या सरळ अंदाजात पाहिलं होतं.

आता तिचा हा टपोरी लूक सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

तेजस्विनी अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्या फॅशन ब्रॅन्डमुळेसुद्धा चर्चेत असते. 'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा चांगलाच दबदबा पाहायला मिळतो. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत.