
'हीरामंडी' वेब सीरिज आणि 'लापता लेडीज' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारल्यामुळे प्रतिभा रंता हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी झाली आहे. सोशल मीडियावर देखील तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

सध्या प्रतिभा हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. प्रतिभा हिने 'हीरामंडी' सीरिजमध्ये फार छोटी भूमिका साकरली होती. पण 'लापता लेडीज' मध्ये मुख्य भूमिकेत दिसली.

हीरामंडी' सीरिजमध्ये प्रतिभा हिने शमा नावाच्या भूमिकेला न्याय दिला होता. 'लापता लेडीज'मध्ये प्रतिभा जया म्हणजे पुष्पा राणी भूमिका साकारली होती.

बॉलिवूडत्या प्रसिद्ध व्यक्तींसोबत काम केल्यामुळे प्रतिभा हिच्या लोकप्रियतेत देखील वाढ झाली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असते.