
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हीना खाननं तीन महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांना गमावलं आहे. 20 एप्रिल 2021 रोजी हीनाच्या वडिलांचं निधन झालं होतं.

वडिलांची आठवण म्हणून हीना खान त्यांच्याबरोबर काही न पाहिलेले फोटो शेअर करत असते.

या फोटोंमध्ये हीना आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे.

फोटोंसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये हीना खाननं लिहिलं आहे की 'डॅडीची सशक्त मुलगी' त्यांच्याशिवाय आता इतकी मजबूत नाही.

हीना तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. वडिल गेल्यानंतर ती त्यांच्या सोबत फोटो शेअर करत असते.

इंडस्ट्रीची एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही हीना खान आणि तिचं कुटुंब डाऊन टू अर्थ आहे असं म्हटलं जातं.