
प्रसिद्ध अभिनेता तनुज विरवानी सध्या पत्नी तान्या जॅकब हिच्यासोबत पॅरिस याठिकाणी हनीमूनचा आनंद घेत आहे. तनुज आणि तान्या यांच्या हनीमूनचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

तनुज विरवानी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा मुलगा आहे. तनूज विरवानी याने 25 डिसेंबर 2023 मध्ये लग्न केलं होतं.

सध्या सर्वत्र तनुज आणि तान्या यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. खुद्द तनुज याने सोशल मीडियावर पत्नीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

तनुज याने सोशल मीडियावर पत्नीसोबत लिपलॉक करताना काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये HoneyMoonersss... असं लिहिलं आहे.

तनुज याच्या पोस्टवर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत... तनुज सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर तनुज याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.