
ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे कायमच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. यांचे अनेक फोटो कायमच सोशल मीडियावर व्हायरल होतात.

ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी अनेकांना अजिबात आवडत नाही. ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या जोडीला अनेकजण बाप मुलीची जोडी देखील म्हणतात.

ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या फोटोला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. नुकताच ऋतिक रोशन याने सबा आझाद हिच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये सबा आझाद आणि ऋतिक रोशन यांचा लूक जबरदस्त दिसतोय. लाल रंगाच्या कपड्यांमध्ये सबा आझाद ही दिसत आहे. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ऋतिक रोशन हा दिसतोय.

ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे दोघे नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला पोहचले होते. या कार्यक्रमातील अनेक फोटो ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचे व्हायरल झाले.